ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व पुण्यातील गांधी राष्ट्रीय स्मारक समितीच्या सचिव शोभनाताई रानडे यांना भारत सरकारने नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. कस्तुरबा गांधी यांची 67 वी पुण्यतिथीही मंगळवारी होती. शोभनाताईं कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तही आहेत. या दोन्ही घटनांचे औचित्य साधून त्यांच्याशी साधलेला संवाद. (दत्तात्रय जाधव)
तुमच्या सामाजिक कार्यामागे नेमकी कोणाची प्रेरणा आहे? : मी लहान असताना हरिभाऊ फाटक यांनी मला हाताला धरून घराबाहेर काढले. त्यांच्या हरिजन सेवकसंघात कामकरीत असे. कॉंग्रेस सेवादलात स्वयंसेवक म्हणूनही जात असे. सेवादलात असताना बापूंना अनेक वेळा जवळून पाहता आले. वय कमी असल्यामुळे त्यांचे फार अप्रूप वाटायचे, बापूजी पाठीवर हात टाकून ‘कशी आहेस’ (केमछो) असे नेहमी विचारायचे. बापूजींना एकदा प्रश्न विचारला आणि भीतीने उसासा सोडला त्यावेळी बापू म्हणाले ‘निर्भय बनके जियो’ हाच शब्द आजही माझ्या कानात घुमतोय. बापूंचा हा संदेशच माझ्या जीवनाची खरी प्रेरणा आहे. कस्तुरबा ट्रस्टला तुमचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. हा अनुभव कसा होता? : विनोबांचा दीर्घ सहवास मला मिळाला. महिन्यातून आठ-आठ दिवस मी त्यांच्या आश्रमात जाऊन राहत असे. त्यांच्याबरोबर तुफानगंजपासून गुवाहाटीपर्यंत पायी चालले आहे. त्यांचा माझ्यावर फार मोठा प्रभाव आहे. ट्रस्टवर विनोबांचे खूप प्रेमहोते. स्वत: बापूंनीही कस्तुरबा ट्रस्टसाठी कामकेले होते. पहिले अध्यक्षही तेच होते. कस्तुरबा ट्रस्टचे कामकरण्याची प्रेरणा विनोबाची होती. मात्र, माझी नणंद ताराबाई साठे खासदार झाल्या नंतर ट्रस्टच्या अध्यक्ष लक्ष्मी मेनन यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांनी माझे नाव ट्रस्टसाठी सुचविले. 1972 पासून आजपर्यंत ट्रस्टचे कामकरीत आहे. कस्तुरबांच्या नावाने सुरू असलेल्या ट्रस्टमध्ये कामकरता आले याचा न्नकीच अभिमान आहे.
कस्तुरबांचे बापूंच्या जीवनातील योगदान नेमके कसे सांगता येईल?
: ‘H$ñ
nwT>o
तुरबा होती म्हणून मी महात्मा झालो’ असे स्वत: बापूंनीच त्यांच्या योगदानाविषयी म्हटले आहे. यातच सर्व काही स्पष्ट होते. कस्तुरबा अखंड बापूंच्या सावली म्हणून राहिल्या. अनेक मुद्द्य़ांवरून त्यांचे मतभेद असत. बापूंनीच त्यांना साक्षर केले होते. बापूंचे त्यांच्यावर बारकाईने लक्ष असे; पण बापू कोणताही निर्णय त्यांच्यावर लादत नसत. आफ्रिकेत असताना त्यांच्याकडे बरेच लोक येत. बापू स्वत:च संडास स्वच्छ करीत असत. एके दिवशी बरेच लोक बापूंना भेटावयास आले होते. बापूंनी त्यांचा संडास साफ करायला कस्तुरबांना सांगितले. नाईलाजास्तव कस्तुरबांनी संडास साफ केला. पण संडास व्यवस्थित स्वच्छ केला नाही म्हणून बापूंनी पुन्हा साफ करायला सांगितले. तेव्हा कस्तुरबांनी साफ नकार दिला. बापू त्यांच्यावर ओरडत म्हणाले, ‘तुला संडास साफ करायचा नसेल तर घरातून बाहेर हो.’ कस्तुरबाही घरातून बाहेर जात म्हणाल्या, ‘मी तुमच्याबरोबर परदेशात आली आहे. तरीही तुम्ही मला घराबाहेर काढता हीच का तुमची संस्कृती?’ बापूंनी माफी मागितली. बापू या घटनेचा उल्लेख करून म्हणतात, ‘मला सत्याग्रह कस्तुरबांनी शिकविला.’ बापूंच्या कार्यात कस्तुरबांनी त्यांना कसे सहकार्य केले? : बापूंच्या प्रत्येक सत्याग्रहात त्यांनी हिरिरीने भाग घेतला. भारतात तर त्यांनी कारावास भोगलाच; पण दक्षिण आफ्रिकेतही त्यांनी तीन महिने सश्रमकारावास भोगला आहे. मुळात बापू सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्यानंतर बापूंना कस्तुरबासाठी वेळही देता आला नाही. पुण्याच्या आगाखान पॅॅलेसमध्ये असताना बापू त्यांना म्हटले, ‘तुला काहीच येत नाही.’ यावर हातातील वही पेन फेकून देत कस्तुरबा म्हणाल्या, ‘तुम्ही मला कधीतरी शिकविले का? तुम्ही शिकविले असते तर मी शिकले असते.’ बापूंचा अतिशय कमी सहवास त्यांना लाभला. आगाखाना पॅलेस मध्ये 1942 मध्ये एकत्र आल्यानंतरच त्यांना खूप काही बोलता आले. या काळात कस्तुरबा आजारी होत्या. तरीही बापूंची त्या काळजी घेत असत. मनू नावाची नात कस्तुरबांच्या सेवेसाठी राहिली होती. कस्तुरबांनी मनूला बापूंना मोसंबीचा रस देण्यास सांगितले मनूला खादीचे कापड सापडत नव्हते म्हणून इतर कापडाने रस गाळून बापूंना दिला. याकडे कस्तुरबांचे बारीक लक्ष होते. कस्तुरबा मनूला म्हणाल्या, ‘खादीचे कापड सापडत नाहीतर मला विचारायचं; पण खादीचा वापर करायचा’ हे त्यांचे तत्त्व आहे. तत्त्वासाठी तसे झगडत आहेत. त्या तत्त्वाशी तडजोड पुन्हा करू नको. अशा रीतीने कस्तुरबांनी बापूंना कायमच पाठिंबा दिला आहे. बापूंना कस्तुरबांसाठी वेळ देता आला नाही, यांची खंत बापूंना होती का?
~mny
: ंना यांची खंत जरूर होती; पण त्यांच्याजवळ कोणता पर्याय होता. राष्ट्रीय चळवळीसाठी बापूंनी झोकून दिल्यानंतर त्यांना वेळ मिळालाच नाही. कस्तुरबांसाठी तर वेळ देता आला नाहीच; पण त्यांच्या मुलांसाठीही वेळ देता आला नाही. आगाखान पॅलेसमध्ये असताना मात्र, त्यांना एकत्र राहता आले. यावेळी मात्र बापूंनी कस्तुरबांची खूप काळजी घेतली. त्या आजारी पडल्यानंतर सरकार त्यांची योग्य काळजी घेत नव्हते. त्यांना पाहण्यासाठी येणाऱ्यांना आणि वैद्यांनाही चांगली वागणूक सरकार देत नव्हते हे पाहून बापू सरकारला लिहितात, ‘एक तर वैद्यांना आत राहू द्या किंवा कस्तुरबांना पॅरोलवर सोडा किंवा मला येथून हालवा. माझ्या समक्ष मला असहाय्यतेचा साक्षी करू नका.’ चळवळीतील नेत्यांना कस्तुरबांकडून काय शिकता आले?
: बापू म्हणत माझ्याकडचा प्रत्येक कार्यकर्ता ‘बा’ च्या तालमीत तयार झालेला होता. येणाऱ्या प्रत्येक माणसाची त्या काळजी घेत. नेहरू, मौलाना आझाद तर त्यांच्या स्वयंपाकघरात जाऊन चहा, नाश्ता करीत असत. त्यांना स्वत:ची विचारसरणी होती. विनोबांना त्यांनी भांडी घासायचे आणि भाजी चिरायचे कामदिले होते; पण विनोबांना ते आले नाही हे स्वत: विनोबांनी मला सांगितले आहे. अशाप्रकारे आश्रमात राहणाऱ्या प्रत्येकाला कस्तुरबांच्या हाताखालून तयार व्हावे लागे. त्या काटेकोर होत्या. कोणतीही गोष्ट पटल्याशिवाय स्वीकारू नका असेच त्या सांगत असत.
कस्तुरबा बापूंच्या प्रभावातून बाहेर आल्या नाहीतच का?
: सर्व देश बापूंच्या शब्दासाठी रस्त्यावर येत होता; पण बापूंची कोणतीही गोष्ट त्यांना पटल्याशिवाय मानली नाही. त्या जित्नया संयमी, काटेकोर होत्या तेवढ्याच भोळ्याही होत्या. एकदा बापूंना म्हणाल्या, ‘तुम्हाला काय करायचे आहे, इतका मोठा आपला देश आहे. इंग्रज येथे राहिले तर राहू द्या तुमचं काय बिघडते.’ बापू उत्तर देताना इंग्रजांना ‘जरूर राहू दे; पण भारतीय म्हणून राज्यकर्ते म्हणून नव्हे.’ हे उत्तर कस्तुरबांना पटल्यानंतरच त्या राष्ट्रीय चळवळीत सक्रिय झाल्या. त्या बापूंच्या प्रभावाखाली जरूर होत्या; पण त्यांची स्वत:ची वेगळी तत्त्वे होती. कस्तुरबांनी स्वत्त्व कधीच सोडले नाही.
गांधी विचारांचा आज विपर्यास केला जात आहे का?
: गांधी विचार समाजाला कळलेच नाहीत. त्यांनी सत्य आणि अहिंसा या दोन भारतीय मूल्यांना त्यांनी नवे आयामदिले. त्यांनी जे मांडले त्यांची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. जगभरात आज अहिंसा दिन साजरा केला जात आहे. कारण जगाला त्यांच्या विचारांची गरज आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटणार नाही. भारतातही त्यांचा मतासाठी वापर केला जात आहे. हे खरोखरच दुर्दैवी आहे. त्यांच्या विचारानेच मानव जातीचे कल्याण होणार आहे.
No comments:
Post a Comment